नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची रविवारी 95 झाली. 102 जणांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला, तर गंभीर रुग्णांची संख्या 193 एवढी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या 478 अहवाल तपासण्यात आले.360 निगेटीव्ह आले, तर 95 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. यात आरटी-पीसीआर चाचणीत 54 तर अंटीजनमध्ये 41 जण पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4 हजार 106 झाली आहे. तर आतापर्यंत 2 हजार 414 जण कोरोनामुक्त झाले, असून 1 हजार 518 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील 193 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
——
तालुकानिहाय रुग्ण
नांदेड मनपा क्षेत्र-14, भोकर-1, हदगाव-3, कंधार-2, मुखेड-1, नायगाव-5, लातूर-1, हिंगोली-3, नांदेड ग्रामीण-2, बिलोली-4, देगलूर-10, लोहा-3, उमरी-1, धर्माबाद-1, परभणी-3, असे 54 जण आहेत.
—–
अंटी जन चाचणीत
नांदेड मनपा क्षेत्र-10, अर्धापूर-1, लोहा-6, उमरी-2, नायगाव-2, बिलोली-1, मुखेड-11, मुदखेड-7 व धर्माबाद-1 असे 41 जण आहेत.
—–
दोन महिला व एक पुरुषाचा मृत्यू
बिलोली तालुक्यातील चिचाळा येथील 60 वर्षीय महिलेचा दि. 15 रोजी मृत्यू झाला. मुदखेड येथील 35 वर्षीय दि. 16 रोजी तर देगलूर येथील पुरुषाचा 70 पुरुषाचा दि. 16 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे.