नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या लॉकडाऊन उघडल्याच्या पहिल्या दिवशी कमी झाली, असून मागच्या बारा ते तेरा दिवस पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. मागच्या चौविस तासात एक मृत्यूचा झाला आहे, तर नवे 39 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे, गंभीर रुग्णांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे.तसेच 43 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 458 नमूने तपासण्यात आले. 391 अहवाल निगेटीव्ह आले, तर 39 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीव्दारे 32 व अॅटीजेन्ट तपासणीव्दारे 7 असे 39 जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 169 एवढी झाली आहे. विविध कोविड केअर सेेंटर व शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेले एकूण रुग्णसंख्या 653 झाली आहे. सध्या 451 जण उपचार घेत असून 10 रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.
———-
चौविस तासात एकाच मृत्यूची नोंद
गोवर्धन घाट रोडवर राहणार्या 67 वर्षीय वृद्धाचा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या 54 झाली आहे.