नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात 1 हजार 309 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज रोजी सातशे नवे रुग्ण आढळून आहेत. तर 25 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला.
सोमवार दि.3 रोजी प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले,की 2 हजार 708 तपासण्या करण्यात आल्या.यात 702 नवे रुग्ण आढळून आले. मनपा हद्दीत 224 तर ग्रामीण भागात 444 जणांचा समावेश आहे.तसेच बाहेर जिल्ह्यातील 34 रुग्ण आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 81 हजार 986 असून आज रोजी 1 हजार 311 कोरोनामुक्त रुग्ण झाले आहेत.त्यामुळे 71 हजार 265 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.सध्या 8 हजार 835 जणांवर उपचार सुरू असून 125 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे.
——–
25 जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात 25 जणांचा मृत्यू दि.1 ते 3 मे दरम्यान झाला आहे. यात 5 महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे. गत वर्षेभराच्या काळात कोरोनाच्या संसर्गामुळे 1 हजार 624 एवढी झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दि.विपीन इटनकर यांनी केले आहे.