असा असेल लसीकरणाचा उधापासून तिसरा टप्पा;जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

नांदेड

नांदेड,बातमी24:-कोरोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्यास सोमवार दि.8 मार्चपासून सुरुवात होत असून या लसीकरण मोहिमेत 60 वर्षावरील वृद्ध नागरिक तसेच 45 वर्षावरील आजारी रुग्णास लस मिळणार आहे. लसीकरणासाठी कोविंड अँपमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे.ज्यांनी नोंदणी केली नाही,अशांनी स्पॉट नोंदणी करून घेत लसीकरण कराव, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले.

या लसीकरण मोहिमेअंतर्गत 45 ते 60 वयोगटातील सर्व नागरिकांना यात अससर्गजन्य आजार उदा.उच्च रक्तदाब,कर्करोग,मधुमेह, किडनी आजार अशाचे सुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे.

ही लस जिह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, महात्मा फुले जण आरोग्य योजने अंर्तगत असलेल्या सर्व खासगी रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुध्दा कोरोनाबाबत लसीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले.

नागरिकांनी कोविड लसीकरणासाठी कोविड अँपवर जाऊन नोंदणी करावी,अथवा स्पॉट नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ.इटनकर यांनी केले.