नांदेड,बातमी24 :-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सर्वाच्या आनंदाला उधान येणे स्वाभाविक आहे. हा उत्सव मोठया प्रमाणात आपण साजरा करत असताना यांच्या सोबतच या देशाचा एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देणारा लोकशाहीचा हा उत्सव ठरावा यासाठी आपण सर्वजण कटिबध्द होवू यात, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जिल्ह्यातील नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटिबध्द आहे. मागील काळात जिल्ह्यात अनेक विकासकामे मार्गी लागली असून वेगवेगळे नवीन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात विकास कामाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे नि:संग्धीत प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी ते त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित मान्यवर तसेच अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी निमंत्रितांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, महापौर मोहिनी येवनकर, विशेष माजी मंत्री डी.पी. सावंत, पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, यांच्यासह जिल्हा परिषद, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी श्री. गुरु गोविंदसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच श्रेणीवर्धन होणार असून सध्या 100 खाटांचे असून तीथे 300 खाटाचे अद्ययावत असे भव्य रुग्णालय आपण उपलब्ध करुन देत आहोत. त्याचप्रमाणे 170 कोटी रुपयाचा अंदाजित खर्च असलेले इतर चार प्रकल्प आपण कार्यान्वित करणार आहोत. यात नांदेड येथील कर्करोगावर उपचारासाठी रेडीओलॉजी युनिट चा समावेश आहे. साथीच्या रोगावर उपचार करण्यासाठी साथरोगाचे एक अद्ययावत, हद्यरोगावर रुग्णावर उपचार करण्यासाठी नांदेड येथे कॉर्डियाक कॅथलॅबचा समावेश आहे. भोकर येथील ग्रामीण रुग्णांलयाचे श्रेणीवर्धन केले असून 100 खाटांचे जिल्हा उप रुग्णालय उभारणार आहोत. पावडेवाडी भागात 100 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भिती व्यक्त करताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत ही सांगितले. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करुन दैनंदिन व्यवहार करावेत असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.