उपचार घेणाऱ्यांची संख्या दोन हजाराच्या आत

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनामुळे बाधित होणाराचा घटत असलेला आकडा दिलासा देणारा आहे,त्यामुळे उपचार घेणाराची संख्या बऱ्याच दिवसांनंतर दोन हजाराच्या आत आली आहे.तर कोरोनावर मात करणारे ही झपाट्याने वाढत आहेत.

बुधवारी आलेल्या अहवालात 899 जणांचे नमुने तपासण्यात आले.यात 760 निगेटिव्ह तर आजरोजी 96 अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 17 हजार 698 झाली. दुसरीकडे 15 हजार 156 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले,यात आजच्या 253 जणांचा सुद्धा समावेश आहे,सध्या 1 हजार 956 जणांवर उपचार सुरू आहेत. 45 जण अतिगंभीर आहेत.
——-
तीन जणांचा मृत्यू
सराफा गल्ली येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि.12 रोजी मृत्यू झाला. कंधार येथील लुंगार गल्ली येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.तसेच चौफाळा येथील 64 महिलेचा दि.13 रोजी मृत्यू झाला.कोरोनामुळे मृत्यू मुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 464 झाली.