नांदेड, बातमी24:- सोमवारी आलेल्या अहवालात 66 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागच्या 24 तासात 420 नमुने तपासण्यात आले. यामध्ये 337 नमुने दूषित आढळून आले,तर 66 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 394 इतकी झाली आहे.तसेच 47 जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 740 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
नांदेड येथील चुनाभट्टी येथील 36 महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच शहापूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मृत्यु संख्या 59 झाली.मात्र 23 रोजी देगलूर येथील 56 वर्षीय इसमाचा मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही. तर 583 जण उपचार घेत आहेत.583 जणांमध्ये 12 जण गंभीर आहेत.यात चार महिला 8 पुरुषाचा समावेश आहे.