नऊ जणांच्या बळी सह रुग्णसंख्या अडीचशे 

नांदेड

नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मागच्या चौविस तासात नऊ झाली आहे. तर रुग्णसंख्येत घट होत आजचा आकडा अडीचशेवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला.
याचसोबत सव्वा तिनशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बुधवार दि. 16 रोजी 918 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 617 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 255 जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 437 जण कोरोना संक्रमित आले आहेत. यातील 8 हजार 234 जणांनी कोरोनावर मात केली, असून सध्या 3 हजार 810 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 45 जणांची प्रकृती नाजूक आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68. 30 टक्के एवढे आहे.
——
9 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे रविवार 13 सप्टेंबर रोजी साखोजीनगर नांदेड येथील 52 वर्षाचा एक पुरुष, सोमवार 14 सप्टेंबर रोजी चिवळी मुखेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बसवंतनगर नांदेड येथील 24 वर्षाची एका महिलेचा, बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा, मंगळवार 15 सप्टेंबर रोजी धानोरा ता. धर्माबाद येथील 55 वर्षाची एक महिला, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राधिकानगर नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल वजिराबाद नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 16 सप्टेंबर रोजी धानोरा ता. नायगाव येथील 70 वर्षाची एक महिला, गोकुंदा किनवट येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 330 झाली आहे.