विद्यापीठातील कोरोना प्रयोग शाळा बंद; हे ठरले कारण

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या तपासणीचे आतापर्यंतपणे तपासणी करणार्‍या विद्यापीठातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समो आल्यानंतर येथील प्रयोग शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे.

सगळी कोरोनाच्या संसर्गाने माणसांना पोखरायला सुरुवात केली आहे. यात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील प्रयोग शाळेत एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर इतर तीन कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रयोगशाळा बंद करावी लागली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या लॅबकडे सर्व नमून तपासणीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.