नांदेड, बातमी24ः– जिल्ह्यातील हजारो कामगार हे रोजंदारीच्या निमित्ताने मोठया शहरात गेली होती. हे मजूर आप-आपल्या गावी परतले आहेत. अशा मजूरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना सौ. अंबुलगेकर म्हणाल्या,की जिल्ह्यातील अनेक शाळा या पटपडताळणी अभावी बंद पडल्या आहेत. मात्र हजारो पालकांची पाल्य हे गावी आलेली आहेत. अशा मुलांना शाळेत प्रवेश देऊन पटसंख्या वाढविण्यात यावी, जेनेकरून विद्यार्थ्यांची शिक्षणाअभावी होणारी फ रफ ट थांबू शकले, याबाबत शिक्षण विभागातील अधिकार्यांना तशा सूचना देण्यात आल्या असून सर्व्हे करण्याबाबत कळविण्यात आल्याचे सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.
शाळांच्या पटसंख्या बाबतचा जसा महत्वाचा विषय होता. तशा शेतकर्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे बियाणे अनेक ठिकाणी उगवण झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी विभागाच्या अधिकार्यांना चौकशी करून अहवाल कळविण्यात सांगण्यात आले आहे. दोषी दुकानदार व कंपन्यांची गय केली जाऊ नये, असे कळविण्यात आल्याचे सौ. अंबुलगेकर यांनी नमूद केले.