दिवसभराच्या काळात एक मृत्यू 13 पॉझिटिव्ह

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- शुक्रवारी सकाळी गुलजारबाग येथील 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यानंतर सायंकाळपर्यंत सर्वच्या सर्व 79 अहवाल निगेटिव्ह आले होते. यानंतर सायंकाळी 7 वाजता 4 तर पुन्हा साडे आठ वाजेच्या सुमारास 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,असे दिवसभरात एक मृत्यू तर 13 कोरोनाचे पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.

नांदेड जिल्ह्यात कमी अधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून सायंकाळी तासाभराच्या अंतराने 13 रुग्ण वाढले आहेत.पाचवाजेपर्यंत 79 नमुन्यांची अहवाल आला होता,हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते.

सात वाजता 7 अहवाल आले यात 4 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शिवाजी नगर येथील 62,बोरबन भागतील 55 वर्षीय महिला,58 वर्षीय गोकुळ नगर,6 वर्षाची बालिका बिलाल नगर येथील आहेत.

साडे आठ वाजता 12 अहवालात 9 अहवाल पॉझिटिव्ह आले. नायगाव येथील 44 पुरुष,कंधार येथील 44 वर्षीय महिला, नांदेड नाथ नगर येथील 22 तरुणी, भगतसिंग रोड येथील 52 वर्षीय महिला, पिरबुऱ्हाण नगर येथील 20 ,19 महिला व 3 वर्षीय बालक तसेच उमर कॉलनी येथील 60 28 वर्षीय महिलाच समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या 344 तर आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.