सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कारवाईने कर्मचारी सरळ;सर्वांसाठी एकच बायोमेट्रिक बसणार

नांदेड

नांदेड, बातमी24:- सकारात्मक कार्याची प्रचती वेळोवेळो देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर चुकणारांची गय किंवा पाठीशी घालण्याच त्या काम ही करत नाहीत.त्यामुळेच विभागवार घेतलेल्या झाडाझडतीमध्ये 150 कर्मचारी गैरहजर आढळून आले.या कर्मचाऱ्यांना एक दिवसांच्या पगारकपतीची दंड दिला.यापुढे जिल्हा परिषदमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच बायोमेट्रिक यंत्रणा बसविली जाणार असून तशा सुचना वर्षा ठाकूर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आपल्या कार्यातून आपली ओळख अशी भूमिका घेऊन प्रशासन चालविणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकुर यांनी चांगल्या बदलासाठी सदैव सकारात्मक असतात.प्रशासन हे हुकूमशाही पद्धतीने चालविण्यापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी चालविले जावे,या त्या कायम आग्रही असतात.मात्र कुणाच्या चुकांवर पांघरून घालणे हे त्यांच्या तत्वात बसत नाही.अधिकारी असो किंवा कर्मचारी यांच्याकडून कामे करून घेणे व लोकांच्या अडचणी सोडविणे यास त्यांचे विशेष प्राधान्य असते.

जिल्हा परिषदमध्ये 18 रोजी ठाकूर यांनी सर्व विभागाचा फेरफटका मारला असता,सलग लागून आलेल्या सुट्यामुले बरेच कर्मचारी गैरहजर आढळून आले.या कर्मचाऱ्याचा एक दिवसाचा पगार कपातीमुले सर्व कर्मचारी वेळेत कार्यालयात येण्याची संख्या लक्षणीयरीत्या दिसून आली आहे.यापुढे जिल्हा परिषद मधील विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एकच बायोमेट्रिक यंत्रणा बसविली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना दांडी किंवा वेळ मारून अवेळी कार्यालयांत आल्यास चाप बसणार आहे.