आज आलेल्या मृत्यूचा तपशीलवार

नांदेड

नांदेड,बातमी24ः मंगळवारी आलेल्या अहवालाने जिल्ह्यातील लाखो लोकांना मोठा धक्का दिला. यात कधी नव्हे इतके 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जुना कौठा भागातील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी झाला. सिडको येथील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी, मुदखेड येथील 70 वर्षीय महिलेचा दि. 27 रोजी, किनवट येथील मोमीनपुर येथील 70 वर्षीय महिलेचा दि.27 रोजी, कासराळी येथील 80 वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू दि. 27 रोजी, नवीन मोंढा येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 28 रोजी, भोकर तालुक्यातील रिठा येथील 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 28, देगलूर येथील 65 वर्षीय महिलेचा दि. 28 रोजी झाला. कुंभारगल्ली येथील 74 वर्षीय तर वजिराबाद भागात राहणार्‍या या दोन्ही रुग्णांचा मृत्यू हा खासगी रुग्णालयात तर आठ रुग्णांचा मृत्यू विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात झाला आहे.
——