एमआयडीसीमधील कामगारांचे लसीकरण करावे:-शैलेश कऱ्हाळे

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मागच्या वर्षेभरापासून उधोग व्यवसाय मोडकळीस आला आहे.शासनाने पुन्हा ताळेबंदी केली आहे.त्यामुळे उधोगसह कामगार वर्ग देशोधडीला लागणार आहे.पुढील काळात उघोग चालले पाहिजे असे सरकार वाटत असेल तर कामगारांचे लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी भाजप उधोग आघाडीचे महानगराध्यक्ष शैलेश कऱ्हाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली.

निवेदनात म्हटले,की उधोगावर आधारित कच्चा मालपुरवठा करणारे व्यवसाय हे सुद्धा चालू असणे आवश्यक आहे.सरकारने याचा विचार करावा,अन्यथा व्यापारी,उधोजक व कामगार वर्ग पुन्हा संकटात सापडेल, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे कऱ्हाळे यांनी शासनाच्या निर्देशनास आणून दिले.

कामगारांवर उपचार करण्यासाठी इएसआयसीचे कागदोपत्री रुग्णालय आहेत.प्रत्यक्षात उपचार मिळत नाही,याकडे शासनाने लक्ष द्यावे, कारखानदाराकडून लाखो रुपयांची फिस वसूल केली जात असल्याचा आरोप कऱ्हाळे यांनी केला.