ऑटो रिक्षासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येणार;इंजि. प्रशांत इंगोले

नांदेड

 

  • नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्यावर जिल्हा प्रशासनाने अमर्याद निर्बंध घातले आहेत . जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक पालकांवर शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन आयोजन करण्यात आल्याची माहिती इंजि.प्रशांत इंगोले यांनी दिली.

कोवीड-१९ च्या धर्तीवर मागील सहा महिन्यापासून राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. या बंदीच्या परिस्थितीमुळे ऑटो रिक्षा चालक मालकांच्या मुलाबाळांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . प्रशासनाने मागील काही दिवसापासून ऑटो चालक मालक यांना ऑटो चालविण्यासाठी परवानगी दिली असली तरी ती अनेक कठोर नियम घालून देण्यात आली आहे . त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या रिक्षा चालक मालक यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. ऑटो मध्ये केवळ दोनच व्यक्तीना प्रवास करण्याची परवानगी दिली. त्यात ऑटोचालक मालकांचा डिझेल पाण्याचा खर्चही निघत नाही.

दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑटो चालक-मालक यांच्या न्याय्य हक्क मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

  • या आंदोलनात ऑटो चालक- मालकानी सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, गोविंद दळवी वंचित बहुजन आघाडी नांदेडचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, शिवाभाऊ नरंगले, महासचिव शाम कांबळे, साहेबराव बेळे, महानगराध्यक्ष अयुब खान पठाण, विठ्ठल गायकवाड महानगर महासचिव एड. शेख बिलाल , हनुमंत सांगळे कामगार आघाडीचे नेते इंजी. राज अटकोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलननाचे जिल्हाध्यक्ष संदीप वने आदींनी केले.