चारशे पैकी शंभर पॉझिटिव्ह;पाच जणांचा मृत्यू

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- मागच्या 24 तासांमध्ये 413 जणांची नमुने तपासण्यात आले.यात 101 जण पॉझिटिव्ह तर 287 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोमवार दि.19 रोजी घेण्यात आलेल्या अहवालात 413 पैकी शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आले,यात आकडेवारी एकूण नमुने तपासण्याची सरासरी पाहता अधिक आहे. तीन पैकी एक जण पॉझिटिव्ह असा याचा अर्थ निघतो. कदाचित चाचण्या वाढल्या असत्या तर रुग्ण संख्या सुद्धा वाढली असती.

आतापर्यंत 18 हजार 180 जण कोरोना बाधित झाले होते.यातील 16 हजार 130 कोरोना मुक्त झाले,असून आजच्या 222 जणांचा सुद्धा समावेश आहे. तर 1 हजार 446 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.यातील 45 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——-
पाच जणांचा मृत्यू
कंधार तालुक्यातील कौठा भागातील 82 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी, लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी, देगलूर नाका येथील 52 वर्षीय पुरुषाचा दि.18,कंधार शहरातील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या 60 वर्षीय पुरुषाचा दि.19 तसेच नांदेड शहरातील बसवेश्वर नगर येथील 54 वर्षीय पुरुषाच्या सुद्धा दि.19 रोजी मृत्यू झाला.त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे 488 जण मरण पावले आहेत.