नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात 33 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रविवारी आलेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
रविवार दि.21जून रोजी 35 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यामध्ये सर्वच्या सर्व नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 थांबली आहे.
शनिवारी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते.यात पिरबुऱ्हाण नगर भागातील 62 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.तर एकाच दिवशी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
आजरोजी कोविड केअर सेंटर येथील 6 व डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालयातील 4 असे दहा रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 219 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 71 इतकी आहे. तर 14 जण मरण पावले आहेत