नांदेड जिल्ह्यात 93 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू

नांदेड

 

नांदेड,बातमी24 :- मंगळवार 2 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 93 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 49 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 411 अहवालापैकी 1 हजार 315 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 837 एवढी झाली असून यातील 22 हजार 385 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 636 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

सोमवार 1 मार्च 2021 रोजी नांदेड तरोडा बु येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मंगळवार 2 मार्च 2021 नांदेड समिराबाग येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 602 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.