नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याची चिंता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायलाने व्यक्त करत नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. चंद्रकांत मस्के यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त होणार्या जागी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून अधिष्ठता पदावरून डॉ. चंद्रकांत मस्के यांनी नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी बदली झाली होती. मात्र अलिकडच्या काळात कोरोनाच्या संदर्भाने डॉ. मस्के यांच्या कार्यपद्धतीवर मोठी नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. कोरेाना संदर्भातील उपाययोजना करण्याबाबत सात कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. अद्याप यातून कामे झालेली नाहीत. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे डॉ. मस्के यांच्यावर नाराज होते, असे समजते.
कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचा दर वाढत असल्याचा ठपका ठेवत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायलाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांना अतिरिक्त कार्यभार देण्यासंबंधी आदेश दिले आहेत. डॉ. देशमुख यांना सोमवार दि. 27 जुलै रोजी रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल कळविण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.
——–
डॉ. देशमुख हे नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होणार असले, तरी डॉ. मस्के यांना आदेश दिले नाहीत.कदाचित कोल्हापुर येथे ते जाऊ शकतात.