शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल; अमित देशमुख वगळता अन्य प्रदेश नेत्यांची पाठ

नांदेड

नांदेड,बातमी24:- काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी बुधवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी लोकांची लक्षणीय हजेरी होती.माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती यावेळी राहिली.

यावेळी जुना मोंढा येथून रॅली काढण्यात आली.अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे रूपांतर भव्य सभेत हिंगोली गेट येथील मैदानावर झाले.यावेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले,की नांदेड ने लातूरला घडविले, शंकरराव चव्हाण यांचा मोठा वारसा या जिल्ह्याला लाभला.मात्र आता नांदेड जिल्ह्याचा प्रवास शंकरराव चव्हाण ते वसंत चव्हाण असा येऊन ठेपला असून देशातील व राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वाधिक निवडून येथील यात वसंत चव्हाण यांची लढाई ही धनदांडगे विरुद्ध गरीब उमेदवार अशी असून वसंत चव्हाण निवडून येथील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम,माजी खा.सुभाष वानखेडे,काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल सतार, आ.मोहन हबर्डे,बी.आर.कदम,ईशवर भोसीकर, शेकाप नेत्या आशा शिंदे,दिलीप पाटील बेटमोगरेकर,संजय बेळगे, आनंद चव्हाण,रवींद्र चव्हाण,सुभाष रायबोळे,श्रीनिवास मोरे,बालाजी चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.