नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या गाड्यांचा ताफा मुखेड येथे शेतकऱ्यांनी अडविला.
ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट पंचनामे करावे व पिक विमा मंजुर करावा या मागणीचे निवेदन बालाजी पाटील ढोसणे,बालाजी सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर यांनी दिले.
ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहीजे,पिक विमा मंजुर झालाच पाहीजे,हम अपना अधिकार मागते,नही किसीसे भिक मागते म्हणत कृषि मंञ्याच्या ताफा अडवला. यावेळी कृषिमंञी दादाजी भुसे गाडीतुन बाहेर येवुन चर्चा केली. सरसकट पंचनामे केली जातील, विमा कंपन्याकडून पंचनामे करा अन्यथा गुन्हे दाखल करु,येणार्या कँबिनेट मिटींग मध्ये चांगला निर्णय येईल असे आश्वासित केले.
निर्णय नाही झाला तर तालुक्यात यापुढे एकाही मंञ्याना फिरु देणार नाही -ढोणसे
ऊद्या कँबिनेट मध्ये जर सरसकट पंचनामे व पिक विम्या बाबत आदेश न काढल्यास पुढे मंञ्याना तालुक्यात फिरु देणार नसल्याचा इशारा बालाजी पाटील ढोसणे यांनी दिला