खासदार म्हणून मलाही लाज वाटावी, अशी परिस्थिती;चिखलीकर झाले व्यथित

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थिती पाहून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्काच बसला, ही परिस्थिती पाहून खासदार म्हणून मला ही लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे, सगळा सावळा गोंधळ व्यथित करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सरकारची सुद्धा खरडपट्टी काढली.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील तक्रारी संदर्भात खासदार चिखलीकर यांनी अचानक रुग्णालयास शुक्रवार दि. 11 रोजी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी कोरोनाच्या संदर्भाने आढावा घेतला, तसेच उपलब्ध खाटा, आयसीयू बेड बद्दल माहिती घेतली. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे हाल होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.

या वेळी माध्यमांना बोलताना चिखलीकर म्हणाले, की या रुग्णालयात पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग नाही. ओपीडीमध्ये कोरोनाचे लक्षणे असणारे रुग्ण उपचार घेत आहेत, ही दुदर्र्ैवाची बाब आहे. या रुग्णाची अत्यंतवाईट आवस्था आहे. सरकार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असल्याचे सांगत आहे. मात्र नांदेडमध्ये ओपीडीमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत.जे बाधित नाहीतख अशांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे चिखलीकर यांनी आहे.
—–
रुग्णालयापेक्षा उकिंडा बरा
या रुग्णालयातील घाण पाहता, ग्रामीण भागातील उकिंडा बरा म्हणण्याची वेळ आहे. इतकी घाण रुग्णालयात आहे. अशी घाण असल्यास रुग्णांचे आरोग्य कसे उंचावेल, असा प्रश्न चिखलीकर यांनी व्यक्त केला.लोकसभेच्या अधिवेशनात या रुग्णालयाच्या प्रश्न मांडावा लागेल, असा इशारा चिखलीकर यांनी दिला.
——
रुग्णालयाचे उद्घाटनाची घाई का होती
नांदेड येथील दोनशे खाटाच्या रुग्णालयाचे उद्घाटन होऊन दोन महिने होऊन गेले. त्या रुग्णालयात आतापर्यंत चार जणांनी उपचार घेतले. यात जिल्हाधिकार्‍यांचा सुद्धा समावेश होता. हे रुग्णालय उपयोगात का आणले जात नाही. मग उद्घाटन करण्याची घाई उद्घाटन करणार्‍यांना का होती, असा टीका चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली.