सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचा वितरण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सायंकाळी होणार आहे,अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव २०२४’ च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (IAS) विभागीय आयुक्त, प्रमुख अतिथी माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव,तर मराठवाडा भूषण’ पुरस्काराचे मानकरी हे पुढील प्रमाणे असून यामध्ये वर्षा ठाकुर-घुगे (IAS) जिल्हाधिकारी, लातुर,साहित्य पुरस्कार मा. श्री. बाबा भांड ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, छत्रपती संभाजीनगर,शैक्षणिक पुरस्कार मा. प्रा. डॉ. सुनिता कराड कार्यकारी संचालक एम आय टी युनिव्हर्सिटी, पुणे,सामाजिक पुरस्कार डॉ. अशोक बेलखोडे ज्येष्ठ समाजसेवक, किनवट, जिल्हा- नांदेड,कृषी पुरस्कार रामकृष्ण मुळे निवृत्त कृषी संचालक महाराष्ट्र राज्य,उद्योग पुरस्कार दिनेश सुर्यकांत वाघमारे सी ई ओ, हाय-टेक सर्व्हिसेस, पिंपरी चिंचवड, पुणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठवाडा समन्वय समिती पुणे ही एक अराजकीय सामाजिक संस्था आहे. या समितीच्या माध्यमातून पुण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींना मराठवाडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

आपल्या अंगभुत साहसी स्वभावामुळे 1995 साली नवीन क्षेत्र निवडुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपण मराठवाड्यातून पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान मिळवलात. पुढील काळात प्रशासनात सामाजिक जाणीव ठेवून कार्य करत प्रत्येक पदाला न्याय दिला. 2011 साली IAS म्हणुन आपली निवड झाली. आज आपण लातुर जिल्हाच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणुन अतिशय सक्षमपणे कार्य करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे, म्हणून यावर्षी चा प्रशासकीय क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड केल्याचे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.