पितृत्व त्यागणारा सनदी सेवेतील बाप माणूस

महाराष्ट्र

जयपाल वाघमारे
मुंबई, बातमी24ः- पिता-पुत्रांमधील नात्यांवर भाष्य करणारे अनेक दाखल इतिहासात मिळतात. कुणी निपुत्री असेल, तर दत्तक वारसा चालवितात. वैवाहिक जिवनामध्ये पितृत्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेत असेल, तर सामाज वेडयात काढतो. परंतु आपल्या ध्येयाप्रती त्याग समर्पणाची भावना ठेवून समाजातील वंचित, उपेक्षीत, भटक्या-विमुक्तांच्या लेकरांसाठी आयुष्य वेचणारे समाजाचा आधार नसून ते कणा आहेत. मी आज ज्यांच्याबद्दल लिहतोय, ते कुणी महंत, संत नसून भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे हे असून यांच्या रुपाने पितृत्व त्यागणार्‍या बाप अपवादाने मिळतो.

आज जगभर बाप दिवस साजरा केला जात असताना आपल्या पित्याच्या त्यागावर, प्रेमावर, चांगुलपणावर, कष्टावर भाष्य करणार्‍या पोस्ट सकाळपासून बघत आहे. हे बघत असताना बापाला वृद्धपकाळात त्रास देणार्‍या आवलादी ही समोर येतात, असो आजच्या दिनी या विषयात आणि भानगडीत फ ारस न पडणे योग्य राहिल.

भंडारा जिल्ह्यातील चिंचाळ या गावी अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. हर्षदीप कांबळे यांना शिक्षणाची प्रचंड गोडी पायलट होण्याचे स्वप्न पाहणारे हर्षदीप कांबळे एमबीबीएस झाले. परंतु डॉक्टर होऊन सामाजिक परिवर्तन व व्यवस्था बदलणे अशक्य असल्याची जाणीव डॉक्टरकीचे शिक्षण घेत असताना तयार होऊ लागली. मात्र  डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आईने मुलामध्ये पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न ते पूर्ण करू शकले. पुढे ते 1997 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी झाले.

सनदी अधिकारी म्हणून प्रशासनात ठसा उमटविलेल्या मोजण्याइतक्याच अधिकार्‍यांमध्ये डॉ हर्षदीप कांबळे यांचा नंबर लागतो. सनदी सेवा करत असताना धम्म कार्यात ही त्यांनी तन, मन व धनाने वाहून घेतले आहे. बुद्ध धम्म व बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा लहानपणापासून राहिला आहे. धम्म कार्यात देशभर फि रणार्‍या डॉ. हर्षदीप कांबळे यांचा थायलंड येथील धम्मसेविका रोजना व्हॅनिच यांच्याशी सन 2011साली त्यांचा विवाह झाला.

आजरोजी त्यांच्या विवाहाला नऊ ते दहा वर्षे झाली आहे. धम्मसेविका रोजना व्हॅनिच कांबळे यांनी संपूर्ण जीवन धम्म कार्यासाठी समर्पित केले आहे. तर डॉ.हर्षदीप कांबळे प्रशासकीय सेवा व धम्म कार्यात सेवा देत असतात. औरंगाबाद येथे धर्मगुरु दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या जागतिक धम्म परिषदेने जगाचे लक्ष वेधले होते. या परिषदेचे नेतृत्व डॉ.हर्षदीप कांबळे व पत्नी रोजना व्हॅनिच कांबळे यांनी केले होते.

हालाखीची गरिबी बघितलेल्या डॉ.हर्षदीप कांबळे यांनी विद्यार्थीदशेपासून गरिब घरातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे, यासाठी कळवळा राहिला.सनदी अधिकारी म्हणून जिथे-कुठे सेवा केली. तेथील वंचित कुटुंबातील लेकरांच्या उत्कर्षासाठी काम करत राहिले. आदिवासी, असो पारधी, दलित असो पददलित अथवा जो कुणी गरिब घरातील आहेत. त्याच्या लेकरांच्या आडल्या-नडल्या अडचणी दूर करण्याचे काम डॉ. हर्षदीप कांबळे नेटाने करत आले आहे.

समाजातील गोर-गरिबांच्या लेकरांप्रती माणून म्हणून आपलेही देने लागले, हा उद्धांत हेतू डोळयासमोर ठेवून कांबळे दांपत्यांनी मातृत्व व पितृत्वाचा त्याग केला. समाजातील गरिबांच्या लेकरांना शिक्षणासाठी लागणारी मदत करण्याची भावना हे दांपत्य जोपासत असते.स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणारे अपवादात्मक व्यक्ती असतात, त्यात डॉ.हर्षदीप कांबळे यांचे व्यक्तीमत्व प्रकर्षाने समोर येते. त्यामुळे पितृत्व त्यागणारा बाप माणूस समाजातील गोर-गरिबांच्या लेकरांचा बाप म्हणून सावलीसारखा उभा राहतो. अशा लेकरांना मदत करणे, त्यांना घडविणे व मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सतत काम करतात. त्यामुळे फ ादर्स डे साजरा करत असताना डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यासारखा पितृत्वाचा त्याग करणारा आणि हजारो वंचित-उपेक्षीत लेकरांचा बाप सापडणे शक्य नाही.

(जयपाल वाघमारे मो.9011127475), नांदेड.