खासदार हेमंत पाटील यांची महत्वाच्या समितीवर वर्णी

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः- हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्यशासनाने अभ्यास समिती गठीत केली आहे. या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यशासनने 22 जुलै रोजी बैठक आयोजित करून अभ्यास समिती गठीत करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सांगली , सातारा,चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतू प्रक्रिया ,साठवणूक आणि विक्रीची पुरेशी सुविधा उपल्बध नसल्याने राज्यातील हळद इतर राज्यामध्ये निर्यात केली जाते.

खासदार हेमंत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय संसदीय वाणिज्य समिती आणि राज्यशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची सचिवपदी कृषी आयुक्तालय पुणे, विभाग ( फलोत्पादन ) संचालक यांची निवड केली आहे. तर सदस्य म्हणून कृषी आयुक्तालय पुणे आयुक्त, परभणी कृषी विद्यापीठ संशोधन संचालक, दापोली कृषी विद्यापीठ संशोधन संचालक,राहुरी कृषी विद्यापीठ संशोधन संचालक ,उपसंचालक स्पाईसेस बोर्ड वाशी ,हळद आयात-निर्यात संघाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र कृषी उद्योग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रतिनिधी, पणन मंडळाचे संचालक ,अन्न औषध प्रशासन प्रतिनिधी, दोन हळद उत्पादक शेतकरी, हळद उत्पादक /प्रक्रिया शेतकरी उत्पादक कंपनी यांची निवड करण्यात आली आहे.