महाविकास आघाडीची ताकद देशाला दाखवून देणे आवश्यक:-अजित पवार

महाराष्ट्र

 

नांदेड,बातमी24-राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विजय मिळविण्याची मोठी संधी महाविकास आघाडी सरकारला असून या निमित्ताने महाविकास आघाडीची ताकद देशात दाखवून देण्याची संधी चालून आली आहे.त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला विजय मिळविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.ते नांदेड येथे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले,की माझ्या 35 वर्षाच्या राजकारणात आम्ही कधीच तिन्ही एकत्र आलो नव्हतो ना एकत्र निवडणूक लढविली नव्हती. मात्र भाजपला रोखण्यासाठी राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत आलो आणि त्यानंतर राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊन लढत आहोत.या निवडणुकीत पाच ही जागेवर विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा होणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मुदावर बोलताना अजित पवार म्हणाले,की आरक्षणावरून भाजपकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता, आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण म्हणाले, की पुढील पाच वर्षे सरकार टिकविण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपने हे सरकार पडणार,आम्ही आज पाडू, दोन महिन्यात पाडू असे स्वप्न पाहत बसावे,महाविकास आघाडी राज्याला पुढे घेऊन जाईल.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर आले,असता आम्हाला बोलबच्चन म्हणून गेले,2 कोटी रोजगार देतो म्हणणारे बोलघेवनडे नव्हते तर कोण होते.असा सवाल अशोक चव्हाण यांनी भाजपला विचारला.केंद्रातील भाजप सरकार हे ज्वलनंत प्रश्नाला बगल देत आहे.तुम्ही त्रास द्याल तर आम्ही पण सोडणार नसल्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला.यावेळी मंत्री उदय सामंत,राज्यमंत्री अब्दुल सतार, खासदार हेमंत पाटील, विक्रम काळे आदींची भाषणे झाली.