जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचे अभियान वाढविणार मुलींचा अभिमान

महाराष्ट्र

 

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- स्त्रीभ्रूणहत्या, लिंगभेदभाव,स्त्रीयांना मिळणारी असमान वागणूक,विनयभंग,बलात्कार अशा घटना समाजमन दूषित करतात, जन्माला येणाऱ्या मुली व महिलांचा कुटूंबात मान सन्मान वाढला पाहिजे,यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बेटी बचाव बेटी पढावो या अभियान अंतर्गत मुलीचे नाव,घराची शान हे अभियान सुरू केले,असून जिल्ह्यातील प्रत्येक घरावर मुलीचे नाव म्हणजे घराची ओळख सांगणाऱ्या पाट्या रंगणार आहे,हे अभियान पूर्णत्वास गेल्यास मुलीचे नाव घराची शान भूषविणारा नांदेड जिल्हा राज्य व देशातील पहिला जिल्हा ठरू शकतो.

स्त्रीभ्रूणहत्या हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे.हा कलंक पुसण्याचे आव्हान शासन अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविले जात असताना. या कार्यात केंद्र व राज्य सरकार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असते.

या अभियानाचा महत्वाकांक्षी भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेटी बचाव बेटी पढाव अभियानचा एक महत्वाचा भाग,ज्यात जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी काही महत्वाचे अभियान सुरू केले आहे,यात मुलीचे नाव,घराची शान हे अत्यंत महत्वाचा कार्यक्रम सुरू केला, असून यामध्ये प्रत्येक घरावरील भिंतीवर घरातील मुलींच्या नावांच्या पाट्या लावण्याचे अभियान सुरू केले आहे.

या संबंधी पाट्याचे अनावरण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी श्रीजया व सुजाय अशोक चव्हाण या नावे पाटी सुपूर्द केली.त्याच सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा रेडी,महिला व बाल कल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर यांच्या मुलींच्या नावे पाटी देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सुरू केलेले महत्वकांक्षी अभियान नांदेड जिल्ह्याची शान वाढविणारे ठरणार आहे.पुढील काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध संस्थेवर काम करणारे लोकप्रतिनिधी,अधिकारी तसेच घरो घरी मुलींच्या नावे पाटी लागलेली दिसेल,असे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शिंगणे यांनी सांगितले.