नांदेडच्या तरूण सिने कलावंताची आत्महत्या

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः- सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण देशभर गाजत असताना नांदेड येथील तरूण सिने कलावंत अशुतोष भाकरे (वय.32 वर्षे) याने राहत्या घरात गळफ ास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. 29 जुलै रोजी घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे.

गणेश नगर भागात राहणार्‍या अशुतोष गोविंद भाकरे या कलावंताने दुपारी दीड वाजेच्या सुमारास गळफ ास घेतला. ही बाब लक्षात येताच घरातील मंडळींनी रुग्णालयात घेऊन गेले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्या नैराश्यातून केल्याचे सांगण्यात येत आहे. अशुतोष भाकरे यांनी भाकर या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच काही मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. मात्र अशुतोष भाकरे यांनी आत्महत्या कशामुळे केले तपासअंती पुढे येणार आहे.