नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील मृतांची संख्या 446 एवढी झाली. आज आलेल्या अहवालात 7 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.तसेच 208 जण कोरोना बाधित झाले आहेत.
बुधवारी आलेल्या अहवालात 1 हजार 277 नमुने तपासण्यात आले. 1 हजार 28 निगेटिव्ह,208 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 881 एवढी झाली. बुधवारी 263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत 13 हजार 476 रुग्ण बरे झाले.यातील संख्या 2 हजार 818 रुग्णांवर उपचार सुरू असून 45 जणांची प्रकृती गंभीर आहे.
———
सात जणांनी सोडले प्राण
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि.3 रोजी,नांदेड येथील अशोक नगर भागात राहणाऱ्या 85 वर्षीय पुरुषाचा दि.6 रोजी,शारदा नगर येथील 62 वर्षीय पुरुषाचा दि.6 रोजी,गजानन मंदिर परिसरातील 62 महिलेचा दि.6 रोजी,श्रीनगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि.6 रोजी, अर्धापुर येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.7 रोजी तर हदगाव तालुक्यातील वडगाव येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि.7 रोजी मृत्यू झाला.