काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खा. चिखलीकर यांच्याविषयी

महाराष्ट्र

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खा. चिखलीकर यांच्याविषयी

नांदेड, बातमी24ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्षांतर्गत घडामोड व पक्षातील नेत्यांकडे त्यांचे विशेष लक्ष असते. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर पत्र पाठवून आरोग्य संपन्न व मंगलमय दीर्घायुष्याचा शुभेच्छा या वेळी नरेंद्र मोदी यांनी दिल्या.

गत वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करून चिखलीकर हे लोकसभेत पोहचले. जिल्ह्याच्या राजकारणात खासदार चिखलीकर यांनी भाजपची ताकद वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. खासदार चिखलीकर यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांची फ ळी उभारली आहे. त्यामुळे रविवारी जिल्हाभरात वाढदिवस साजरा करण्यात आला.

राज्यभरातील नेत्यांकडून शुभेच्छा संदेश पाठविण्यात आले. यात महत्वाचा संदेश ठरला तो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होय. ते म्हणाले, की वाढदिवस हा गतस्मृतिंना उजाळा देत असतो. त्याचसोबत तो नवी उर्जा, नव्या उत्सहाने आपल्या कुटुंब, समाज आणि आपल्या राष्ट्रापती कर्तव्याचे पालन करण्याची प्रेरणा देत असतो.

मी आशा करतो, की देशाच्या प्रगतीमध्ये आपले योग्य योगदान सातत्याने मिळत राहिल, तसेच नव भारत संकल्पनाचा केला, तो पूर्ण करण्याचा दिशेने वाटचाल जोमदारपणे सुरु राहिल. आपल्या जीवनात सुख,शांती व समृद्धी अशीच कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करत वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिल्या.