जिल्ह्यातील बीएसएफ जवानाचा मृत्यू

महाराष्ट्र

 

कंधार, बातमी24:-
कुरुळा येथील बी.एस.एफ. जवान गणेश पिराजी चव्हाण (वय.४२ वर्षे) मेघालय येथे कर्तव्यावर असताना आज दि.१८ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.मात्र मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कंधार तालुक्यातील कुरुळा गावात वास्तव्यास राहणारे चव्हाण कुटुंबीय.वडील पिराजी चव्हाण यांचे गणेश हे चौथे अपत्य होते.गणेश हे मेघालय येथील तुरी येथे कर्तव्यावर असताना आज १८ रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच कुरुळा गावावर शोककळा पसरली.

त्यांचे पार्थिव उद्या कुरुळा गावात येणार असून त्यांच्या पार्थिवावर कुरुळा गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.गणेश चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे वडील,तीन भाऊ ,दोन बहिणी ,पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.