भिंगे त्यांच्या बाबत नाराजी;निर्णय मात्र शरद पवारांचा:-हरिहर भोसीकर

राजकारण

 

नांदेड,बातमी24:- प्रा.यशपाल भिंगे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकी बाबतीत पक्षा अंतर्गत नाराजी नक्की आहे.मात्र या संदर्भाने जो काही निर्णय झाला,तो पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केले,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना भोसीकर म्हणाले,की प्रा.भिंगे यांच्या आमदारकीवरून पक्षात नाराजी होती.जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी यांचा विरोध होता,तशी भावना पक्षापर्यंत कळविण्यात आली होती. पक्ष अध्यक्ष खा.शरद पवार यांनी निर्णय घेतला.तो निर्णय अंतिम व मान्य आहे.

पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास ग्रामीण जिल्हाध्यक्ष करण्याची संधी दिली.ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर पुढील काळात विशेष भर असणार आहे.ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर 16 तालुक्यांचा दौरा केला जाणार आहे.पक्षाला पूर्वीसारखे गतवैभव निर्माण करण्याचा माझा मानस असल्याचे भोसीकर यांनी सांगितले.
——-
महाआघाडीशी समन्वय राखणार
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी समन्वय राखला जाणार असला,तरी आमचा पक्ष वाढविला जाणार आहे,यात कधी कमी पडणार नसल्याची ग्वाही भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.