कुंडलवाडीत भाजपला झटका

राजकारण

नांदेड, बातमी24ः बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपालिकेवर भाजपचे एकाहाती वर्चस्व आहे. मात्र येथील भाजपच्या सत्तेला धक्का बसला, असून भाजपची नगराध्यक्ष महिलाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने अपात्र ठरली आहे.

कुडलवाडीचे नगरध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेस राखीव होते. सन 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून डॉ. अरूणा विठ्ठल कुडमुलवार या उमेदवार होत्या. तर काँग्रेसकडून अर्चना भिमराव पोतनकर यांनी अर्ज भरला होता. नगरपालिकेची निवडणूक ही थेट जनतेतून होती. त्या वेळी भाजपच्या डॉ. अरूणा विठ्ठल कुडमुलवार या विजयी झाल्या होत्या.

विजयी झाल्यानंतरही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत दाखल करता आले नाही. त्यानंतर बारा महिन्यांच्या मुदतवाढ देण्यात आली होती. तरी प्रमाणपत्र सादर करता न आल्याने अर्चना पोतनकर यांनी यावर आक्षेप औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. नगरारचना विभागाने डॉ. अरूणा कुडमुलवार यांचे नगराध्यक्ष पद रद्द ठरविले आहे. नगराध्यक्ष महिलेचे पद रद्द ठरविण्यात आल्याने भाजपला मोठा झटका मानला जात आहे.