लॉकडाऊन संदर्भाने जिल्हाधिकारी अंडरप्रेशर ऑफ पॉलिटीक्स अ‍ॅण्ड पॉलिटीशियन!

राजकारण

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः– कोरोना प्रादुर्भाव आता सामुदायिक संसर्गात पसरला आहे. कोरोनाची संख्या नांदेड शहरासह- ग्रामीण भागात वाढत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे मात्र अंडर द लाईन ऑफ पॉलिटीक्स अ‍ॅण्ड प्रेशर ऑफ पॉलिटीशियन असे काम करत असल्याची चर्चा सामान्यांमधून जोर धरू लागली आहे. त्यामुळेच दि. 14 जुलैनंतर लॉकडाऊन लागण्याची चर्चा पुढे येत असल्याचे बोलले जात आहे.

नांदेड जिल्ह्याच्या मातीला राजकीय व प्रशासकीय परंपरा मोठी लाभली आहे. या भूमित अनेक बडे राजकारणी होऊन गेले,त्यांच्या दुरदृष्टीचा वारसा जिल्ह्याला लाभला, तसेच अशोक चव्हाण यांच्यासारखे धुरंदर राजकारणी नांदेडच नेतृत्व राज्यपातळीवर करत आहेत.त्यांच्या रुपाने नांदेडला मुख्यमंत्रीपद दोन वेळा मिळाल. त्याचसोबत नांदेडला काम केलेल्या अधिकार्‍यांना राज्य व देशपातळीवर पुढे काम करण्याची संधी मिळाली आहे. पूर्वी प्रशासकीय पातळीवर नांदेडचे नाव सन्मानाने घेतले जात असत.परंतु अलिकडच्या काही वर्षांमध्ये नांदेडला अधिकार्‍यांना येणे नकोसे झाले आहे.

चांगले अधिकारी एक तर येत नाहीत. आले तर टिकू दिले जात नाही.अशी बोंबाबोंब झाली आहे. परभणी जिल्हाधिकारी पदावरून टी.शिवशंकर यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली आदेश निघाले. परंतु अत्यंत कडक शिस्तीचा अधिकारी नको म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला आणि शासनाने आदेश बदलत डॉ. विपीन इटनकर यांना नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बसविले. टी.शिवशंकर यांचा धाक अधिकार्‍यांवर तर वचक राजकारण्यांवर नको याच उद्देशाने बदली आदेश अचानकपणे रद्द करावे लागले.

डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकारी म्हणून आले.मात्र कोरोनात गुरफ टून गेले. गुरुव्दारा परिसरात रुग्णसंख्या वाढत असताना त्या भागात ठोस भूमिका न घेता विनंतीपर हाताची घडी घालत काम करावे लागले. त्यानंतर अनेक भागात रुग्ण संख्या वाढत असताना प्रभावी कृती कार्यक्रम राबविता आला नाही. ठोस अशी भूमिका न घेतल्याने टाळेबंदीची झळ नांदेडकरांना कधी बसलीच नाही. खुलेआम नांदेडकर बिनधास्त नांदेडकर असेच चित्र सर्वदूर होते.

आता सगळीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हाधिकारी या नात्याने डॉ.विपीन इटनकर हे ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण वाढले, की तेथील तहसीलदार व मुख्याधिकारी हे तिथे चार ते पाच दिवसांची संचारबंदी लावतात. मात्र नांदेडमध्ये प्रशासन संख्येची वजाबाकी व बेरीज करत बसते.

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, इतर जिल्ह्यांप्रमाणे लॉकडाऊन करण्याची मागणी सामान्यांमधून होत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नियम कडक करण्यावर भर दिला.औपचारिकता म्हणून व्यापार्‍यांचा सल्ला घेत लॉकडाऊन बाबत निर्णय पुढे ढकलला. आता दि. 15 रोजी लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरु झाली आहे.

दरम्यानच्या काळात वाढणार्‍या रुग्णांची संख्या फ ारशी गांभीर्याने घ्यायची नाही काय? तोपर्यंत नियम कडक करायचे आणि दि. 14 नंतर टाळेबंदी करायची असे प्रशासनाचे दिसते. दि. 14 तारखेनंतर मुहर्त शोधण्याचे ठोस असे कोणते कारण आहे.जे, की या दरम्यानच्या काळात टाळेबंदीचे आदेश देता येणार नाही. इतर जिल्ह्यात तर पचांग किंवा मुहर्त साधून टाळेबंदीबाबत निर्णय होत नाही. मग; दि. पंधरानंतर का?कदाचित दि.14 नंतर टाळेबंदीचे आदेश लागल्यास नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे अंडरलाईन ऑफ पॉलिटीक्स अ‍ॅण्ड प्रेशर ऑफ पॉलिटीशियन असे काम करतात, यावर शिक्कामोर्तब होईल, तशी चर्चा व्हायला आतापासून सुरुवात झाली आहे.
——
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आढावा बैठक सोमवारी झाली होती. सोमवारी रात्रीच संचारबंदी लागणार होती. तसे पत्र जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत होते. परंतु अचानक त्या रात्री निर्णय बदलला. पुन्हा दि.9 रोजी लागणार हे पण जवळपास निश्चित मानले जात होते. आता 15 जुलैची चर्चा सुरु झाली आहे.