काँग्रेसचा आज बैलगाडी लाँगमार्च

राजकारण

 

नांदेड,बातमी24:-देशातील शेतकरी आणि कामगार यांना देशाधडीला लावणारे विविध विधेयके केंद्र सरकारने संसदेमध्ये मंजूर करून घेतले आहे. पार्श्ववी बहुमताचा गैरवापर करून मंजुर करून घेतलेल्या या विधेयकाच्या निषेधार्थ महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कॉग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी लाँगमार्च काढण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार्‍या या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चची सुरूवात 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता रेल्वेस्टेशन समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात येणार आहे.

हा लाँगमार्च त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून देशाचे कणखर माजी पंतप्रधान यांच्या लाल बहादुर शास्त्री यांच्या मनपा समोरील पुतळ्यास पुष्पहार घालून लाँगमार्चची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.