एन-95 मास्कवरून डी.पी. सावंत यांचे केंद्रावर टीकास्त्र

राजकारण

नांदेड,बातमी24:- आरोग्य मंत्रालयाला आता हा एन-95 मास्क आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या संशोधन, प्रयोग व विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, असे मत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

डी.पी. सावंत म्हणाले,की यांनी देशात कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याचे केंद्र सरकारने आवाहन केले होते. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने व्हॉल्व्ह असलेला एन-95 मास्क हा अतिशय सुरक्षित असून त्याचा प्राधान्याने वापर करण्याचे निर्देश काढले होते.

पण कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यात एन-95 मास्क अयशस्वी ठरत आहे. तसेच कोव्हिड-19 विरोधात सुरू असलेल्या लढाईत हे मास्क हानिकारक असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले.
एन-95 मास्कवरून अचानक घेतलेल्या ङ्गयु-टर्नफमुळे आरोग्य मंत्रालयांतर्गत येणार्या विविध संशोधन संस्थांची विश्वासार्हताच उरली नाही, असे माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी सांगितले.