नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे.कोरोनाचा संसर्ग कोणास होईल, याचा नेम नाही. मात्र नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सामान्यांपासून ते काही असमान्य गणमुर्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र सामान्य रुग्ण हे शासकीय रुग्णालयात येथे फ क्त गोरगरिब जनता उपचार घेत असताना सत्ताधारी मायबाप नेतेमंडळी नांदेड सोडून उपचार घेत आहेत. येथील सत्ताधार्यांच सरकारच्या शासकीय रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटर व खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयांवर भरवसा न्हाय असा प्रश्न निर्माण होत आहे.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेकांनी या संसर्गातून बरे व्हावे,यासाठी प्रार्थना केल्या, तशा शुभेच्छा विरोधकांना देताना नांदेडमधील डॉक्टरांवर भरवसा न्हाय काय असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यांनी सुद्धा औरंगबाद येथे, माजी महापौर यांनी सुद्धा बाहेर जाऊन उपचार घेतले, उपमहापौरांनी नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले.
दोन दिवसांपूर्वी आमदार अमरनाथ राजूरकर हे कोरोना पॉझिटीव्ह निघाले. ते मुंबईला उपचारास गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी औरंगाबाद येथे उपचार घेतले. गोजेगावकर यांनी कोरोनावर मात करून घर गाठले. अशा बडया मंडळींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर किंवा नांदेडमध्ये असलेल्या एकाही खासगी रुग्णालयावर भरवसा नसल्याचे सिद्ध होत.
सामान्य जनतेने नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे, आणि बरे होऊन शकले तरे बरे व्हायचे अन्यथा हे राम आहेतच. करोडो रुपयांचा खर्च कोरोनाचा संसर्गांवर अटकाव आणण्यासाठी केला जात असताना मृत्यूचे प्रमाण ही नांदेडमध्ये अधिक आहे. कोरोनाची साखळी तोडत असताना मृत्यू दर ही कमी करणे महत्वाचे आहे. शासनाची वैद्यकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे हे मान्य करावे लागणार आहे. सामान्य रुग्ण उपचारास शासकीय रुग्णालयात जातील, असामान्य रुग्ण सुद्धा शासकीय उपचारासाठी आले पाहिजे, इतका विश्वास वैद्यकीय प्रशासनाला निर्माण करावा लागणार आहे. अन्यथा बडा नेता किंवा अन्य बडी हस्ती पॉझिटीव्ह आली, की इतरत्र उपचारास जाणार हे नक्कीच म्हणावे लागेल.