मा.आमदार साबणे यांचा रडत पडत शिवसेनेला पूर्णविराम; भाजपच तिकीट जाहीर

राजकारण

नांदेड, बातमी24:-शिवसेनेकडून दोन वेळा आमदारकी भोगणाऱ्या माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेचा त्याग केला.यावेळी त्यांनी शिवसेना सोडताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवित शिवसेना पक्ष अशोक चव्हाण यांनी संपविल्याची टीका केली. यावेळी त्यांनी ढसा ढसा रडत सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळविल्या. आज भाजपच्या केंद्रीय समितीने साबणे यांची उमेदवारी जाहीर केली,तर ते उधा अधिकृतपणे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत..

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 ऑक्टोब रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
ही निवडणुक काँग्रेससाठी गड राखण्यासाठी महत्वाची मानली जात आहे,तर भाजपकडून पंढरपूर पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असणार आहे.
काँग्रेसने मागच्या काही दिवसांमध्ये या मतदार संघात करोडो रुपयांचा निधी दिला आहे. इकडे भाजपकडून कॉंग्रेसला कडवे आव्हान देण्यासाठी माजी आमदार सुभाष साबणे यांना गळाला लावले असून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यावर आले, असता साबणे यांनी फडणवीस यांची नरसी तेथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी साबणे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विषयी रडगाणे गात शिवसेना जिल्ह्यातून संपविल्याचा आरोप केला. यावेळी साबणे यांनी शिवसेनाबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवत भाजप प्रवेश केला.भाजपकडून साबणे यांची उमेदवारी जाहीर झाली असून काँग्रेसकडून कुणाचे नाव जाहीर होते,याकडे आता लक्ष लागले आहे.वंचीतही दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचे पक्षाच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.