खासदार चिखलीकर यांच्यासह आमदार राजूरकर यांचाही पाठिंबा

राजकारण

नांदेड, बातमी24ः राज्यातील अकृषिक विद्यापीठात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपास भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊनल पाठिंबा दर्शविला.

काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा पक्षाचे विधानपरिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी सोमवार दि. 29 रोजी तसेच याच दिवशी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुद्धा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विद्यापीठ इमारती समोर सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या सर्व मागण्यांसंदर्भात पाठिंबा दिला.

या वेळी राजूरकर यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश पावडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. महेश मगर यांची उपस्थिती होती.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. तसेच कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांना कर्मचार्‍यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावे ही विनंती केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष आदित्य शिरफुले, विद्यापीठ कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.