शासकीय बंगल्यावरील गटारी आमवस्या दोन कर्मचार्‍यांच्या मुळावर

राजकारण

नांदेड,बातमी24ः- सोमवार मास खाणे काही वर्ज्य मानतात.त्यामुळे बहुतांशी जणांनी गटारी आमवस्या रविवारीच साजरी केली. जिल्हा परिषदेच्या एका सभापतीच्या बंगल्यावर साजरी करण्यात आलेल्या गटारी आमवस्या एका शिपाई व चालक महागात पडल्याची चर्चा चर्चेचा विषय ठरत आहे.

आमदार अमरनाथ राजूरकर यांचा कोरोनाचा रिपार्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सोबत कायम राहणार्‍या व संपर्क आलेल्या सर्वांचे धाबे चांगलेच दणाणले होते. प्रत्येकाने स्वतःहून होम क्वॉरंटाईन करून घेतले. यात सुदैवाने राजूरकर यांच्या मित्रपरिवारातील कुणाचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला नाही. मात्र जिल्हापरिषद एका सभापतीच्या बंगल्यावरील शिपाई दोन दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह आला आहे. तर सभापतींचा चालक मात्र गुरुवारी पॉझिटीव्ह आला. या दोघांनी गटारी आमवस्या दिवशी बंगल्यावर सेवेकर्‍याची भूमिका बजावल्याचे समोर येत आहे.

गटारी आमवस्येने सोशल डिस्टंन्सिंगचा फ ज्जा उडविल्याचे बोलले जात आहे. पॉझिटीव्ह आलेल्या दोन्ही कर्मचार्‍यांवर कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत. शिपाई पॉझिटीव्ह आल्यापासून दबक्या आवाज चर्चा सुरु होती. मात्र चालकाचा सुद्धा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने बंगल्यावरील गटारी आमवस्येच्या कारणीभूत ठरल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगू लागली आहे.