बदल्या संदर्भात आजी-माजी अध्यक्षांची भूमिका ठरली महत्वाची

राजकारण

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे सार्वत्रिक बदल्या रद्द होऊ शकल्या.

जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या बदल्यांचा भरणारा बाजार थांबविण्यात यावा, अशी मागणी विविध कर्मचारी संघटना, काही अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांकडू न केली जात होती. मात्र बदल्या करण्यातबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभाग आग्रही होता.

कोरोनाचा वाढत्या संसर्गास जिल्हा परिषदेच्या बदल्यांची प्रक्रिया अधिक कारणीभूत ठरू नये, यासाठी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी प्रत्येक अधिकारी व पदाधिकार्‍याशी संवाद साधून बदल्या केल्या आणि कोरोनाचा धोका वाढला, तर यात जिल्हा परिषदेची फ ार मोठी बदनामी होऊ शकते. आपत्ती कायद्यांचा भंग केल्यासारखे होईल, यात अधिकारी अडचणीत येतील, असे बाब प्रत्येकाचे निर्देशनास आणून दिली. बेटमोगरेकर यांनी प्रत्येकाशी व्यवस्थीत संवाद साधून सदरची बाब लक्षात आणून दिली.

जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर या सुद्धा बदल्याबाबत फ ारशा उत्साही नव्हत्या. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, बदल्या काळात जिल्हा परिषद प्रांगणात हजारो कर्मचारी जमू शकतात, ही शंका त्यांच्या मनात सुरुवातीपासून होती. मात्र इतर पदाधिकार्‍यांचे मत बदल्याबाबत स्पष्ट नव्हती. त्यामुळे सर्व विभाग प्रमुख व पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. सर्वांचे मते ऐकूण घेतल्यानंतर मंगाराणी अंबुलगेकर यांनी बदल्या रद्द करण्यात याव्यात, असे फ र्मान अधिकार्‍यांना दिले. त्यामुळे प्रशासनाने प्रेसनोट काढून बदल्यांची प्रक्रिया रद्द करत असल्याचे जाहीर केले.

बदल्या होऊ नये, सुरुवातीपासून माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेेकर यांची इच्छा होती. त्यामुळे तशाप्रकारे शिष्टाई सुरु केली होती. यावर कळस चढविण्याचे काम विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. या आजी व माजी आमदारांनी बजावलेली भूमिका कोरोनाच्या पार्श्वभमिवर महत्वाची ठरली.