कोरोनाशी लढणाऱ्या दोन आमदारांचे असे झाले रक्षाबंधन

राजकारण
नांदेड,बातमी24:- कोरोनाने जगाला चक्रावरून सोडले आहे. कोण कोरोनाच्या संसर्गात सापडेल याचा नेम नाही. जिल्ह्यातील दोन आमदार कोरोनाशी दोन हात करत आहेत.वर्षानुवर्षे रक्षाबंधन साजरे करत असणाऱ्या या आमदारांची रक्षाबंधनची उणीव रूग्णालयातील परिचरिकांनी भरून काढत या दोन आमदारांसोबत रक्षाबंधन  साजरे केले.
काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर व हदगाव-हिमायतनगर विधान सभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे  मुंबई येथील दोन वेगवेगळ्या रुग्णलयात उपचार घेत आहेत.
आमदार राजूरकर हे आठ ते नऊ दिवसांपूर्वी कोरोना।पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मुंबईत उपचारास दाखल झाले तर जवळगावकर हे मागच्या बुधवारी मुंबईत उपचारास गेले.
या दोन्ही आमदारांचे रक्षाबंधन बहीण-बाळात साजरे होऊ शकले नसते,तरी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर महिला व स्टाफ नर्सकडून राजूरकर व जवळगावकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
_____

आमदार राजूरकर यांची कोरोनावर मात

विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी कोरोनावर मात केली. मुंबई येथील एका खासगी रुग्णालयातून राजूरकर यांना सुट्टी देण्यात आली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी कोरोनावर मात करत राजूरकर यांनी कुटुंबियांना सुखद वार्ता दिली.