उपमहापौर देशमुख यांची सुद्धा कोरोना मात

राजकारण

नांदेड, बातमी24ः- नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे उपमहापौर सतिश देखमुख तरोडेकर यांनी सुद्धा कोरोनावर मात करून घरी परतले. सतिश देखमुख यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

माजी महापौर व त्यांचे नगरसेकव पुत्राच्या संपर्कात आल्याने सतिश देशमुख तरोडेकर यांचा अहवाल ही कोेरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर बुधवार दि. 15 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी माजी महापौर व त्यांचे सुपुत्र नगरसेवकास सुद्धा काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पालकमंत्री अशोक अशोक चव्हाण, दक्षीण उत्तरचे आमदार मोहन हंबर्डे यांनी सुद्धा कोरोनावर मात करून घर गाठले आहे.