खासदार पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह

राजकारण

नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा  अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.असे निकटवृतीयांकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यावर उपचार सुरु आहेत. या राजकीय नेत्यांना कोरेानाचा संसर्ग झालेला असताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांचा सुद्धा अहवाल रात्री कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी पावडेवाडी नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवृतीयांकडून देण्यात आली.
——–
चौकट
प्रवीण पाटील चिखलीकर हे मुंबईवरून रविवारी सकाळी आले होते. काळजी म्हणून त्यांनी अ‍ॅटीजन टेस्ट केली असता त्यात ते कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियातील सर्वांची चाचणी करण्यात आली आहे.