जिल्ह्याला नव्याने येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची उत्सुकता; डॉ.इटनकर यांना जाऊन आठ दिवस उलटले

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड,26:- नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची मागच्या शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली.यास आठ दिवस उलटले आहे.जिल्ह्याला नव्याने जिल्हाधिकारी म्हणून कोण येणाऱ याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.सुरुवातीला जे काही नावे चर्चेत होती,ती नावे मागे पडत असल्याने जिल्ह्याला कोण आणि कधी जिल्हाधिकारी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचा तसा पाहता कार्यकाळ पूर्ण झाला होता.अडीच वर्षे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. विशेषतः कोरोना काळात त्यांनी घेतलेले निर्णय व मदतकार्य यादगार राहिले. बदलीच्या सरतेशेवटी हर घर तिरंगा अभियान घरो घरो पोहचविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले,जिल्ह्यावर येणाऱ्या प्रत्येक आपत्तीच्या काळात घटनास्थळावर जाऊन मदत कार्यास गती देणारा तडफदार अधिकारी डॉ.इटनकर यांच्या रूपाने सर्वांना बघायला मिळाला. सर्वांशी स्नेह,मैत्री आणि शक्य तितक जलद प्रशासन देण्याचा प्रयत्न राहिला.डॉ.इटनकर यांची नवे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलीची चर्चा सुरू झाली होती.त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत काही वेगळे वाटण्याचे कारण ही नव्हते.

डॉ.इटनकर यांच्या बदलीनंतर कोण नवे जिल्हाधिकारी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून रोज नवे नाव समोर येत असल्याने मागची नावे गळून पडत आहे.नेमके कोण येणार हे मात्र आदेश प्राप्त होईपर्यत सांगणे कठीण झाले आहे.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील असून चिखलीकर यांची शिफारस महत्वाची मानली जात आहे.तसे नसली तरी येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना खा.चिखलीकर याना झुकते माप देऊन काम करावे लागणार हे मात्र निश्चित आहे.

सीईओ ठाकूर यांना पण मिळ शकते संधी
नांदेड जिल्हाधिकारी म्हणून नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे नाव चर्चेत आहे.यदा कदाचित ठाकूर यांचे सुद्धा आदेश ऐनवेळी निघाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.