प्रभारी कार्यकारी अभियंत्यांचे जिल्ह्यातील आमदारांनाच आव्हान

नांदेड

नांदेड, बातमी24ः– जिल्हा परिषद ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरक्त पदभार सांभाळणार्‍या आर.एस. बारगळ यांनी मोजक्या पदाधिकारी व प्रभारी सीईओंना हाताशी धरून जिल्ह्यातील आमदार व जिल्हा परिषद सदस्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न चालविल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काही आमदारांनी तक्रार केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे हे सर्व आमदार महाविकास आघाडीतील आहेत.

नांदेड जिल्हा परिषदेचा अलिकडच्या काळातील कारभार रसातळा गेल्याचे बोलले जात आहे. अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवर ना पदाधिकार्‍यांचे अधिकार्‍यांवर नियंत्रण राहिल्याचे बघायला मिळत नाही. प्रभारीराजवर सुरु असलेला कारभार नियंत्रणाबाहेर जात आहे. देगलूर पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता असलेल्या आर.एस. बारगळ यांच्याकडे पदभार देण्यात आलेला, असून टगेगिरी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे. विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांशी एकेरी भाषा व्यवहार तर सदस्यांसोबत उमर्टपणा चालविला आहे.

चंद्रसेन पाटील या भाजपच्या सदस्यांना दालनात कसे काय आले, या विचारणा करत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली खुद चंद्रसेन पाटील यांनीच केली आहे. अनेक नियमबाह्य कामांना मंंजूरी देणे,प्रत्यक्ष कामे न होताना बिल मंजूर करून पाठविणे, शासनाच्या आदेशाला फ ाटयावर मारून माळेगाव येथील पाणी पुरवठा योजना सुरु करणे,असे कामे केल्याच्या तक्रारी बारगळ यांच्याविरोधात झाल्या आहेत.

लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी सुद्धा बारगळ यांची मंत्रालयस्तरावर तक्रार केली आहे. नायगाव विधान सभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्याशी सुद्धा बारगळ यांनी हुज्जत घातल्याचे खुद राजेश पवार यांनी सांगितले. या प्रकरणी अधिवेशनात तक्रार करणार असल्याचे आमदार पवार म्हणाले, हदगाव-हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितलेले कामे केल्याचे सांगण्यात आले, असून जवळगावकर हे सुद्धा नाराजी असल्याचे सांगण्यात आले. हजारो मतदारांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकप्रतिनिधींसोबत वादा-वादी करण्याच्या प्रकारामुळे बारगळ हे चांगलेच चर्चेत आले आहेत.
——
या प्रकरणी आर.एस. बारगळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असता त्यांच्याकडून फ ोनला प्रतिसाद मिळू शकला नाही.