बारावीच्या परीक्षेत उत्तीर्णचे प्रमाण वाढले

नांदेड

नांदेड, बातमी24ः- बहुप्रतिक्षित बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणे या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उत्तीण होण्याचे टक्का गतवर्षींच्या तुलनेत सुधारला आहे. जिल्ह्यातील 31 हजार 999 विद्यार्थी पास झाले आहेत.

कोरोनामुळे उद्भावलेल्या महामारीमुळे बारावी परीक्षेाचा निकाल उशिराने लागला, यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक चांगला निकाला आला, असून 95.01 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत विज्ञान शाखेतील 14 हजार 456 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याखालोखाल वाणिज्य शाखेतील 3 हजार 694 विद्यार्थी उर्त्तीण झाले, असून निकालाची टक्केवारी 91.91 टक्के इतकी आहे. तर कला शाखेतील 13 हजार 126 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 80.94 इतकी आली आहे.
——
गतवर्षीपेक्षा निकाल सुधारला

मागच्या वर्षी म्हणजे 2019 च्या निकाल पाहता एकूण उत्तीर्ण निकालाची टक्केवारी 86.20 इतकी होती. यंदा यात कमालीची सुधारणा झाली,असून 2020 या वर्षांमधील निकाल उत्तीण होण्याचे प्रमाण 87.94 टक्के इतकी आहे. 2.14 टक्याने वाढ झाली आहे.