जिल्हाधिकारी डॉ.इटनकर रमले सामाजिक न्याय’च्या पर्यावरण परिसरात

नांदेड

नांदेड,बातमी24:-राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमताने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहायय कार्यालयास भेट दिली.यावेळी सामाजिक न्याय कार्यालयाने उभारणी केलेल्या नेत्रदीपक पर्यावरणीय परिसर व गाडर्न पाहून जाम खूष झाले,यावेळी त्यांनी बराच वेळ गार्डनमध्ये घालविला.

नांदेड येथील ग्यानमाता रोडवर भव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालयाची भव्य इमारत आहे.हा इमारत परिसर सामाजिक न्यायचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. वंचीत उपेक्षित समाजाचे न्याय भवन आहे.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहायय कार्यालयास भेट देऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस तेथेच अभिवादन केले. त्यानंतर या परिसरात समाजकल्याण सहायय आयुक्त तेजस माळवदकर यांनी या कार्यालया परिसरात भव्य वनराई नटविली आहे. झाडाने या परिसराला नैसर्गिक सौदर्य आले आहे.त्यातच गार्डन तयार करून त्यात विविध जातीचे फुलाचे झाडे डोळ्यांना प्रसन्नता देऊन जातात.असाच सुखद अनुभव डॉ.विपीन इटनकर यांनी घेतला.

कार्यालयाच्या वतीने केलेल्या व्हीसी रूम तसेच निवासी शाळा व वसतिगृह सीसीटीव्हीने कसे जोडले गेले याचे प्रात्यक्षिक माळवदकर यांनी डॉ. इटनकर यांना दाखविले.तसेच सामाजिक न्याय कार्यालया अंतर्गत शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनाबाबत ऑनलाईनशी जोडल्याबदल डॉ.इटनकर यांनी विशेष रित्या तेजश माळवदकर यांचे अभिनंदन करत कार्यालय परिसर व कार्यालयीन कामकाज पद्धती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.