नांदेड उत्तरचे आमदार कल्याणकर यांना पितृशोक

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वडिलांचे बुधवार दि.30 रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते.

नांदेड शहरापासून जवळ असलेल्या तरोडा(खुर्द) येथील शेतकरी देविदास भुजंगराव कल्याणकर यांना मागच्या तीन ते चार दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता,त्यानंतर त्यांना नांदेड येथील खासगी रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असताना बुधवार दि.30 रोजी बारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. मयत देविदास कल्याणकर यांच्या पार्थिवावर तरोडा (खुर्द) येथे बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,तीन मुली व नातू असा मोठा परिवार आहे.