बारगळ यांचा घाशा गुंडाळल्याने जि. प.मध्ये गम कम खुषी ज्यादा

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदमध्ये हम करे सो कायदा अशी राजवट चालविण्याचा हट्टहास हा बारगळ यांची पाठराखण करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांची दातखीळ पडणारा ठरला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील बारगळ यांची शासनाने केलेली हकालपट्टीवरून जिल्हा परिषदेत गम कमी खुषी ज्यादा असे बघायला मिळाले,असून बहुतांशी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद हे मागच्या वर्षभरापासून रिक्त आहे.या रिक्त जागेवर देगलूर येथील उपअभियंता बारगळ यांच्याकडे पदभार देण्यात आला.या काळात बारगळ यांनी अनियमिततेचा बाजार भरविला होता. तसेच लोकप्रतिनिधीसोबत असभ्य भाषा व गैरवर्तणुक करण्याच्या तक्रारी वाढत गेल्या होत्या.यावरून आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी बारगळ हट्टाव यासाठी मंत्रालयस्तरावर जोर लावला होता.

दरम्यानच्या काळात मंत्र्याच्या पत्रांना सुद्धा फाट्यावर मारण्याचा प्रकार समोर आला,यातून बारगळ यांनी विभागात टगेगिरी सुरू केली होती.या सगळ्या प्रकारावरून अखेर बारगळ यांना राज्य शासनाने हटवित त्यांच्या जागी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याकडे पदभार सुपूर्द केला आहे. बारगळ यांच्या काळात काढलेली बिले तसेच हाताळलेल्या संचिकांची चौकशीची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.